Stock Market Closing On 28 March 2024: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2023-24, या आर्थिक वर्षाचा शेवट गोड झाला. बँकिंग एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे BSE सेन्सेक्समध्ये 639 अंकांची वाढ झाली, तर NSE निफ्टीमध्ये 203 अंकांची वाढ झाली. दिवसाच्या अखेरीस सेनेक्स 73,651 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 22,327 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. मीडिया क्षेत्राचे शेअर्स मात्र घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 4 तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढीले, तर 8 तोट्यासह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटींची वाढशेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 386.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या सत्रात 383.85 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)