Join us

शेयर बाजारात जबरदस्त तेजी, सेंसेक्स 938 तर निफ्टीत 223 अंकांची मोठी वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 5:36 PM

या वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने पुन्हा एकदा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला.

Stock Market Closing On 29 April 2024: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (29 एप्रिल) शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. आजच्या सत्रात बँकिंग शेअर्सचे वर्चस्व पाहायला मिळाले. यामुळे बँक निफ्टीने लाइफ टाईम उच्चांक गाठला. सेन्सेक्स 941 अंकांनी वाढून 74,671 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 223 अंकांच्या उसळीसह 22,643 अंकांवर बंद झाला. 

या वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने पुन्हा एकदा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 406.59 लाख कोटी रुपयांवर पोहचले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 404.09 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समुळे बाजाराला गती मिळाली. याशिवाय फार्मा, एफएमसीजी, मेटल, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. मात्र ऑटो आणि आयटी शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 हिरव्या तर 4 लाल रंगात बंद झाले.

आजच्या व्यवहारात आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 4.67 टक्क्यांच्या वाढीसह लाइफ टाईम हायवर पोहोचले. तर एसबीआय 3.09 टक्के, इंडसइंड बँक 2.93 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 2.93 टक्के, ॲक्सिस बँक 2.47 टक्के, एनटीपीसी 2.07 टक्के वाढीसह बंद झाले. तर, एचसीएल टेक 5.79 टक्के, आयटीसी 0.44 टक्के, विप्रो 0.37 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.01 टक्क्यांनी घसरले.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय