Lokmat Money >शेअर बाजार > चढ-उतारानंतर Sensex-Nifti फ्लॅट नोटवर बंद; गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 2.52 लाख कोटी...

चढ-उतारानंतर Sensex-Nifti फ्लॅट नोटवर बंद; गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 2.52 लाख कोटी...

Stock Market Closing On 5 July 2024 : आजच्या सत्रात एनर्जी, एफएमसीजी, फार्मा, मेटल, ऑटो, हेल्थकेअर आणि ऑइल&गॅस क्षेत्रात वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 04:52 PM2024-07-05T16:52:25+5:302024-07-05T16:55:32+5:30

Stock Market Closing On 5 July 2024 : आजच्या सत्रात एनर्जी, एफएमसीजी, फार्मा, मेटल, ऑटो, हेल्थकेअर आणि ऑइल&गॅस क्षेत्रात वाढ.

Stock Market Closing On 5 July 2024: Sensex-Nifti closes on flat note after ups and downs; Investors earned ₹ 2.52 lakh crore | चढ-उतारानंतर Sensex-Nifti फ्लॅट नोटवर बंद; गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 2.52 लाख कोटी...

चढ-उतारानंतर Sensex-Nifti फ्लॅट नोटवर बंद; गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 2.52 लाख कोटी...

Stock Market Closing On 5 July 2024 : दिवसभरतील चढउतारानंतर भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक Sensex आणि Nifti आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात(दि.5) फ्लॅट नोटवर बंद झाले. आजच्या सत्रात एनर्जी, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 72 अंकांच्या घसरणीसह 79,977 अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 12 अंकांच्या वाढीसह 24,314 अंकांवर बंद झाला.

आजच्या सत्रात एनर्जी, एफएमसीजी, फार्मा, मेटल, ऑटो, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर, बँकिंग, आयटी आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शअर्स घसरले. आज शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 449.82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तर, काल हे 447.30 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी 2.52 लाख कोटी रुपयांची कमाई केली.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या ट्रेडिंग सत्रात, एसबीआय 2.48%, रिलायन्स 2.32%, हिंदुस्तान युनिलिव्हर 2.01%, एनटीपीसी 1.86%, एल अँड टी 1.52%, पॉवर ग्रिड रु 399.40, नेस्ले 1.19%, आयटीसी 1.11%, कोटक बँक, 0.76%, सन फार्मा 0.9% भारती एअरटेल 0.47 आणि बजाज फायनान्स 0.42 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर HDFC बँक 4.55 %, टायटन 1.99 %, टाटा स्टील 0.85 %, इंडसइंड बँक 0.65 %, अल्ट्राटेक सिमेंट 0.59 % आणि टाटा मोटर्स 0.54 % घसरुन बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

Web Title: Stock Market Closing On 5 July 2024: Sensex-Nifti closes on flat note after ups and downs; Investors earned ₹ 2.52 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.