Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात भूकंप; Sensex 1017 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25000 च्या खाली

शेअर बाजारात भूकंप; Sensex 1017 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25000 च्या खाली

Stock Market : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 5.3 लाख कोटी रुपये बुडाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:46 PM2024-09-06T16:46:10+5:302024-09-06T16:46:35+5:30

Stock Market : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 5.3 लाख कोटी रुपये बुडाले.

Stock Market Closing: Stock Market collapse; Sensex fell by 1017 points, Nifty below 25000 | शेअर बाजारात भूकंप; Sensex 1017 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25000 च्या खाली

शेअर बाजारात भूकंप; Sensex 1017 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25000 च्या खाली

Stock Market Closing : शुक्रवारी (6 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन बाजारातून येणाऱ्या कमकुवत संकेतांचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स-निफ्टी प्रत्येकी दीड टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. सर्व सेक्टरही लाल चिन्हावर आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास 300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर सेन्सेक्स 1000+ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. 

बाजाराच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 1,017.23 अंकांनी घसरुन 81,183.93 वर बंद झाला अन् निफ्टी 292.95 अंकांनी घसरुन 24,852.15 वर बंद झाला. बीएसई निर्देशांकातील टॉप 30 शेअर्सपैकी एसबीआयमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले. याशिवाय, एचसीएल, रिलायन्स, टाटा मोटर्स, आयटीसी, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्सही लाल रंगात बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 5.3 लाख कोटी बुडाले
आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसईचे बाजार भांडवल 460.36 लाख कोटी रुपयांवर आले, जे काल 465.66 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 5.3 लाख कोटी रुपये बुडाले.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Stock Market Closing: Stock Market collapse; Sensex fell by 1017 points, Nifty below 25000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.