Join us  

Share Market Crash Today : शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 700 अन् निफ्टी 208 अकांनी घसरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 4:04 PM

Share Market Crash Today : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 4.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Stock Market Closing On 13 August 2024 : शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस(दि.13) अतिशय वाईट ठरला. आजच्या सत्राची सुरुवात घसरणीसह झाली, मात्र काही वेळानंतर त्यात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. पण, दिवसाखेर BSE सेन्सेक्स 693 अंकांच्या घसरणीसह 78,956 अकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 208 अंकांच्या घसरणीसह 24,139 वर आला.

मार्केट कॅप घसरलेआजच्या व्यवहारात बँकिंग, एनर्जी, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार मोठ्या प्रमाणावर खाली आला. तर, कंझ्युमर ड्यूरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्येच खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 693 अंकांच्या घसरणीसह 78,956 अंकांवर आणि निफ्टी 208 अंकांच्या घसरणीसह 24,139 अंकांवर बंद झाला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 4.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआज हिंदुस्थान कॉपरचा शेअर 3.37 टक्क्यांनी वाढून बंद झाला. याशिवाय बलराम चिनी 3.28 टक्के, अरबिंदो फार्मा 3.01 टक्के, डिक्सन टेक्नॉलॉजी 2.76 टक्के, मॅरिको 2.47 टक्के, टीव्हीएस मोटर 2.24 टक्के, टायटन कंपनी 1.89 टक्के, अपोलो रुग्णालय 1.34 टक्के वाढीसह बंद झाले. तर, आरती इंडस्ट्रीज 15.45 टक्के, चंबळ फर्टिलायझर 7.08 टक्के, झायडस लाइफ 5.99 टक्के, एचडीएफसी बँक 3.28 टक्के, टाटा स्टील 2.37 टक्के, बजाज फायनान्स 2.02 टक्के, एसबीआय .78 टक्के आणि टाटा मोटर्स 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक