Stock Market Closing : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज(दि.23) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान शेअर बाजारात मात्र बराच चढ-उतार पाहायला मिळाला. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प वाचत असताना सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली, पण बाजार बंद होईपर्यंत त्यात बऱ्यापैकी रिकव्हरी होताना दिसली. सुरुवातीला सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी घसरला, पण नंतर बाजाराने पुन्हा वेग पकडला.
गडकरी, शाह, राजनाथ ते शिवराज...अर्थसंकल्पात कोणत्या मंत्र्याला मिळाला सर्वाधिक निधी? पाहा
आजचे सत्र संपेपर्यंत बीएसई सेन्सेक्स 73 अंकांनी घसरुन 80,429 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह 24,479 अंकांवर बंद झाला. बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 1.82 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अर्थसंकल्पाच्या दिवशी बीएसई मार्केट कॅप 446.50 लाख कोटी रुपयांवर आला, जो सोमवारच्या सत्रात 448.32 लाख कोटी रुपयांवर होता.
हे 10 शेअर्स सर्वाधिक घसरलेशेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी बीएसईच्या 30 पैकी 13 शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले, तर 17 शेअर्स लाल चिन्हावर बंद झाले. L&T शेअर (3.10%) सर्वाधिक घसरले. याशिवाय लार्ज कॅप कंपन्यांमधील बजाज फायनान्स शेअर (2.18%) आणि SBI शेअर (1.65%) घसरुन बंद झाले. मिडकॅप कंपन्यांमध्ये NIACL (5.79%), IRFC (5.08%), GICRE शेअर (4.15%) घसरणीसह बंद झाले. तर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये IRCON शेअर 7.99%, SCI 7.53%, RCF 7.49% आणि NFL शेअर 7.09% ने घसरले.
"अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया; समाजातील प्रत्येक घटकाला बळ मिळणार" - PM मोदी
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)