Lokmat Money >शेअर बाजार > मी सिग्नलवर भीक मागेन पण यापुढे... बाजार कोसळल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मी सिग्नलवर भीक मागेन पण यापुढे... बाजार कोसळल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Stock Market Crash : ट्रम्प टॅरिफ लागू झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात कोरोनानंतर सर्वात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीतही लोक सोशल मीडियावर याची मज्जा घेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:59 IST2025-04-07T13:58:48+5:302025-04-07T13:59:21+5:30

Stock Market Crash : ट्रम्प टॅरिफ लागू झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात कोरोनानंतर सर्वात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीतही लोक सोशल मीडियावर याची मज्जा घेत आहे.

Stock Market Crash Memes viral On Social Media As Nifty And Sensex Down | मी सिग्नलवर भीक मागेन पण यापुढे... बाजार कोसळल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मी सिग्नलवर भीक मागेन पण यापुढे... बाजार कोसळल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Stock Market Crash : शेअर मार्केट आणि क्रिकेटमध्ये एक साम्य आहे. दोन्ही ठिकाणी कधी काय होईल सांगता येत नाही. हातातून गेलेला सामान सलग ५ षटकार मारुन जिंकणे असो की वर गेलेलं मार्केट काही सेकंदात कोसळणे असो. इथे कोणालाच अंदाज लावता येत नाही. भारतीय शेअर बाजार तर सध्या प्रचंड अस्थिर झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या क्रॅशमध्ये भारतीयांचे ४६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे बाजार पडल्याने गुंतवणूकदार निराश आहेत, तर दुसरीकडे यावरुन सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याला हसून प्रत्त्युत्तर कसं द्यायचं हे फक्त भारतीय व्यक्तीच सांगू शकतो. खरं पाहायला गेलं तर शेअर बाजाराने गुंतवणूकदारांचा बाजार उठवला आहे. अशा परिस्थितीतही लोक ऐकमेकांची मज्जा घेत आहेत. निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही भारतीय निर्देशांकांमध्ये घसरण पाहून लोकांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. फिल्मी मीम टेम्पलेट्सपासून ते क्लासिक GIF पर्यंत, नेटिझन्सनी सध्याच्या बाजारावर विनोदी प्रतिक्रिया दिली आहे.

यातील काही नमुने तुमच्यासाठी

 

 

 

 

 

 

 

Web Title: Stock Market Crash Memes viral On Social Media As Nifty And Sensex Down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.