Join us

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे चीनचा हात? काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी लॉस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 12:07 PM

Stock Market Crash: शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप १०.५४ लाख कोटी रुपयांनी घसरून ४५०.३५ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

Stock Market Crash : गेल्या महिन्यात झपाट्याने वर जाणारा भारतीय शेअर बाजार आता पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे खाली येत आहे. शेअर बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये भूकंप आला. यामध्ये काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये लॉसमध्ये गेले. शेअर बाजार सकाळी तेजीसह उघडला होता. मात्र, परदेशी गुंतवणूकदारांच्या तीव्र विक्रीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये त्सुनामी आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १६०० आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक ६५० अंकांनी घसरला. शेअर बाजारातील पडझडीमागे चीनचं कनेक्शन समोर आलंय.

BSE सेन्सेक्स सध्या ३४६ अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी १५१ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतातून आपली गुंतवणूक काढून घेत असून चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे गेल्या ६ सत्रांपासून भारतीय बाजारात त्यांची विक्री होत असल्याने बाजारात मोठी घसरण झाली आहे.

आज (सोमवारी ७ ऑक्टोबर) सकाळी चांगल्या जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार ग्रीन सिग्नलमध्ये उघडला. आयटी, बँकिंग शेअर्समध्ये खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली. पण बाजार उघडल्यानंतर एक तासानंतर विक्री सुरू झाली. यातील सर्वाधिक विक्री मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक २००० अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ८०० अंकांनी दिवसाच्या उच्चांकावरून घसरला. दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स १००० अंकांनी तर निफ्टी ३५० अंकांनी घसरला. आता बाजार रिकव्हरीवर परतला आहे. सेन्सेक्स निफ्टी सपाट व्यवहार करत आहे.

भारतीय शेअर बाजार पडण्यामागे चीनचा हात?भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदार पैसा काढत असून चीनमध्ये गुंतवत असल्याचे समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील शेअर बाजारात पाण्यासारखा पैसा आला आहे. काही दिवसांपूर्वीच चीन सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही आर्थिक पावलं उचलली होती. यामध्ये केंद्रीय बँकेने व्याजदरात केलेली कपातीचा समावेश आहे. तसेच थंडावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी चीनी सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे चीनमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारचीनगुंतवणूक