Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात 'या' दोन कारणांमुळे घसरण, सेन्सेक्स ३७९ अंकांनी आपटला 

शेअर बाजारात 'या' दोन कारणांमुळे घसरण, सेन्सेक्स ३७९ अंकांनी आपटला 

मंगळवारी 2 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:23 PM2024-01-02T16:23:21+5:302024-01-02T16:23:33+5:30

मंगळवारी 2 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.

stock market fall Sensex fell by 379 points due to these two reasons share market closing bell | शेअर बाजारात 'या' दोन कारणांमुळे घसरण, सेन्सेक्स ३७९ अंकांनी आपटला 

शेअर बाजारात 'या' दोन कारणांमुळे घसरण, सेन्सेक्स ३७९ अंकांनी आपटला 

Share Market Today: मंगळवारी 2 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रेड सी मधील वाढता तणाव यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढणं पसंत केलं. सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 21,650 अंकांपर्यंत घसरला.  

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ घसरणीसह रेड झोनमध्ये राहिले. आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण रियल्टी, ऑटो, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये दिसून आली. दुसरीकडे फार्मा, मेटल आणि ऑइल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 8 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.85% वाढ झाली. यानंतर, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 0.70% ते 1.76% च्या वाढीसह बंद झाले.

यात सर्वाधिक घसरण
तर उर्वरित 22 सेन्सेक्स समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्येही कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक 1.98 टक्क्यांनी घसरले. तर अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो आणि ICICI बँक यांचे शेअर्स 0.66% ते 1.43% च्या घसरणीसह बंद झाले.

Read in English

Web Title: stock market fall Sensex fell by 379 points due to these two reasons share market closing bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.