Join us  

शेअर बाजारात 'या' दोन कारणांमुळे घसरण, सेन्सेक्स ३७९ अंकांनी आपटला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 4:23 PM

मंगळवारी 2 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.

Share Market Today: मंगळवारी 2 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रेड सी मधील वाढता तणाव यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढणं पसंत केलं. सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 21,650 अंकांपर्यंत घसरला.  मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ घसरणीसह रेड झोनमध्ये राहिले. आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण रियल्टी, ऑटो, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये दिसून आली. दुसरीकडे फार्मा, मेटल आणि ऑइल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढबीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 8 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.85% वाढ झाली. यानंतर, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 0.70% ते 1.76% च्या वाढीसह बंद झाले.यात सर्वाधिक घसरणतर उर्वरित 22 सेन्सेक्स समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्येही कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक 1.98 टक्क्यांनी घसरले. तर अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो आणि ICICI बँक यांचे शेअर्स 0.66% ते 1.43% च्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार