Join us

Stock Market: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 09:45 IST

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात तेजीसह झाली होती पण बाजार उघडल्यानंतर लगेचच तो घसरणीसह व्यवहार करत होता.

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात तेजीसह झाली होती पण बाजार उघडल्यानंतर लगेचच तो घसरणीसह व्यवहार करत होता. सेन्सेक्स सुरुवातीच्या कामकाजादरम्यान ३२९.२८ अंकांनी घसरून ७९,२१२ वर तर निफ्टी ११५ अंकांनी घसरून २४,०८३.८० वर बंद झाला. आज पेज इंडस्ट्रीजचा शेअर २.५ टक्क्यांनी वधारून व्यवहार करत होता. बँक निफ्टी ओपनिंगमध्येच १०० अंकांनी घसरला आहे.

बाजाराची सुरुवात कशी झालीय़

बीएसईचा सेन्सेक्स ७०.११ अंकांनी वधारून ७९,६११.९० अंकांवर तर एनएसई निफ्टी ८.३५ अंकांनी वधारून २४,२०७ अंकांवर उघडला. मात्र यानंतर यात मोठी घसरण झाली.

कामकाजादरम्यन व्होडाफोन आयडियाचा शेअर पुन्हा ८ रुपयांच्या खाली घसरला आहे. इन्फोसिसमध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर मिडकॅप आयटी क्षेत्रात आज चांगले ट्रेंड पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :शेअर बाजार