Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Today : विक्रमी स्तरावरुन घसरला शेअर बाजार, जागतिक दबाव; बँकिंग-फायनान्स शेअर्समध्ये विक्री

Share Market Today : विक्रमी स्तरावरुन घसरला शेअर बाजार, जागतिक दबाव; बँकिंग-फायनान्स शेअर्समध्ये विक्री

Share Market Opening 3 September: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवा उच्चांक नोंदवल्यानंतर मंगळवारी बाजारावर काहीसा दबाव दिसून आला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:45 AM2024-09-03T09:45:17+5:302024-09-03T09:45:40+5:30

Share Market Opening 3 September: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवा उच्चांक नोंदवल्यानंतर मंगळवारी बाजारावर काहीसा दबाव दिसून आला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली.

Stock market falls from record level global pressure Sale in Banking Finance Shares | Share Market Today : विक्रमी स्तरावरुन घसरला शेअर बाजार, जागतिक दबाव; बँकिंग-फायनान्स शेअर्समध्ये विक्री

Share Market Today : विक्रमी स्तरावरुन घसरला शेअर बाजार, जागतिक दबाव; बँकिंग-फायनान्स शेअर्समध्ये विक्री

Share Market Opening 3 September: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवा उच्चांक नोंदवल्यानंतर मंगळवारी बाजारावर काहीसा दबाव दिसून आला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली.

दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांनी सकाळी सव्वानऊ वाजता किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरू केले. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स ४० अंकांनी घसरून ८२,५३० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. निफ्टी ५० निर्देशांक जवळपास १० अंकांनी घसरून २५,२७० अंकांच्या खाली आला होता.

प्री-ओपनमध्ये किंचित तेजी

प्री-ओपन सेशनमध्ये बाजारात किंचित तेजी होती. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स ९० अंकांच्या वाढीसह ८२,६५० अंकांच्या वर व्यवहार करत होता, तर निफ्टी जवळपास ३५ अंकांनी वधारून २५,३१५ अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. बाजार सुरू होण्यापूर्वी सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये निफ्टी फ्युचर्स मजबूत दिसत होते. निफ्टीचा फ्युचर्स सुमारे १७ अंकांच्या प्रीमियमसह २५,३५५ अंकांवर होता.

जागतिक शेअर बाजाराची स्थिती

कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अमेरिकन बाजार बंद होता. वायदा व्यवहारात डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ०.१० टक्क्यांनी घसरला. आशियाई बाजार आज नफ्यात व्यवहार करत आहेत. जपानचा निक्केई ०.१८ टक्के, तर टॉपिक्स ०.३८ टक्क्यांनी वधारला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.१७ टक्के आणि कॉसडॅक ०.०२ टक्क्यांनी वधारला. 

बँकिंग-फायनान्स शेअर्स घसरले

सेन्सेक्समधील बहुतांश बँकिंग आणि फायनान्स शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात नकारात्मक स्थितीत दिसून आले. बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक १.२० टक्क्यांनी घसरले. बजाज फिनसर्व्हमध्ये ०.७० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस सारख्या आयटी शेअर्समध्येही विक्रीचा कल दिसून आला. दुसरीकडे, आयटीसीमध्ये ०.५० टक्क्यांची तेजी दिसून आली. सन फार्मा आणि टाटा मोटर्स सारख्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

Web Title: Stock market falls from record level global pressure Sale in Banking Finance Shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.