Top-10 Firms Market Value: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी मागच्या आठवडा खूप वाईट ठरला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील बहुतांश कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. पण, दोन कंपन्यांनी मात्र त्यांच्या गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून दिला. या दोन्ही कंपन्या आयटी क्षेत्राशी संबंधित आहेत. सेन्सेक्सच्या टॉप-10 सामील असलेल्या Infosys आणि TCS ने चार दिवसांत प्रचंड नफा कमावला. तर, रिलायन्स, एसबीआयसह 8 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले.
SBI ला मोठा झटका
बाजार भांडवलानुसार, गेल्या आठवड्यात देशातील शीर्ष 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 1,65,180.04 कोटी रुपयांनी कमी झाले. तर, गेल्या आठवड्यात फक्त चार दिवस व्यवहार झाला, ज्यात बीएसई सेन्सेक्स 1,906.01 अंकांनी किंवा 2.39 टक्क्यांनी घसरला. गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवारी शेअर बाजार बंद होता. या चार दिवसांच्या कालावधीत देशातील सर्वात मोठी बँक SBI ला सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला. बँकेचे मार्केट कॅप 34,984.51 कोटी रुपयांनी घटून 7,17,584.07 कोटी रुपयांवर आले.
या कंपन्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले
इतर कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे मार्केट कॅप रु. 27,830.91 कोटींनी घसरुन रु. 5,61,329.10 कोटी झाले, मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप रु. 22,057.77 कोटींनी घसरुन 17,15,498.91 कोटी झाले, ITC चे मार्केट कॅप 15,449.47 कोटी रुपयांनी घसरून 5,82,764.02 कोटी रुपये झाले, तर भारती एअरटेलचे मार्केट कॅप 11,215.87 कोटी रुपयांनी घसरुन 8,82,808.73 कोटी रुपये झाले. याशिवाय, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे मार्केट कॅफ 4,079.62 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,74,499.54 कोटी रुपये झाले.
इन्फोसिस-टीसीएस नफ्यात
एकीकडे रिलायन्स-एसबीआयसह 8 कंपन्यांसाठी शेवटचा आठवडा वाईट ठरला, तर दुसरीकडे शेअर बाजारात प्रचंड चढउतार असतानाही इन्फोसिसने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला. 13,681.37 कोटी रुपयांच्या उडीसह इन्फोसिसचे बाजार भांडवल 7,73,962.50 कोटींवर पोहोचले. तर, टाटा समूहाची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) देखील नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये सामील होती. तिचे बाजार भांडवल 416.08 कोटी रुपयांनी वाढून 15,00,113.36 कोटी रुपये झाले.
(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)