- पुष्कर कुलकर्णीशेअर बाजारात रक्कम जेव्हा गुंतविण्यास सुरवात करता तेव्हा ते एक बीज असते. कालांतराने त्याचे रोपटे, झाड आणि अनेक वर्षांनी वटवृक्ष होत असतो. बाजार अनेक कारणांनी वर - खाली होत असतो. सन २००८ मधील मंदी आणि २०२० मधील कोरोना या अती कठीण प्रसंगी बाजार एकतर्फा खाली आला हे आपण अनुभवले आहेच. पण त्यानंतर पुढील काळात एकतर्फा वरही गेला हे ही पहिले आणि अनुभवले. त्यामुळे आपण लावलेले बीज नक्कीच मोठे होईल यावर विश्वास आणि धीर हवा. बाजार जसा वाढेल तशी आपली संपत्तीही नक्कीच वाढेल. फक्त तुमची साथ हवी उत्तम कंपन्यांसोबत. आज इंग्रजी अक्षर ‘जी’ पासून सुरू होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी...
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GODREJCP)गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GODREJCP) - गुडनाईट, लाल - काळे हीट, सिंथॉल असे ब्रॅण्ड्स आपल्याला माहित असतीलच. याच बरोबर पर्सनल केअर विभागात गोदरेजची अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. कन्झ्युमर गुड्स क्षेत्रातील एक चांगली कंपनी म्हणून परिचित.फेस व्हॅल्यू : रुपये १/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. ८१९/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. ८४ हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु.९८५/- आणि लो ६६०/-बोनस शेअर्स : दोन वेळा. २०१७ व २०१८ मध्ये.शेअर स्प्लिट : १:४ सन २००६ मध्येडिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत शेअर तिपटीहून अधिक वाढला आहे.भविष्यात संधी : दैनंदिन गरजेची उत्पादने असल्याने व्यवसाय उत्तम राहू शकतो. यामुळे या शेअरलाही गुंतवणूकदारांकडून मागणी राहील.
गुजरात गॅस लि. (GGAS) नॅचरल गॅस, लिक्विड गॅस, सीएनजी सप्लाय आणि डिस्ट्रिब्युशन हा प्रमुख व्यवसाय. कंपनीद्वारे जवळपास १७ लाख घरांत पाईपलाईन द्वारे घरोघरी एलपीजी कनेक्शन डिस्ट्रिब्युशन आहे.फेस व्हॅल्यू : रु. २/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. ४८१/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रुपये ३३हजार ५०० कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु. ७२२/- आणि लो-४०३/-बोनस शेअर्स : अद्याप नाहीशेअर स्प्लिट : जाने २०१९ मध्ये १:५ या प्रमाणातरिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल आठ पट रिटर्न मिळाले आहेत.डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भविष्यात संधी : गॅस ही अत्यंत गरजेची आणि जीवनावश्यक वस्तू आहे. औद्योगिक क्षेत्रातही विविध प्रकारच्या गॅसचा वापर होत असतोच. या व्यवसायास कधीही मरण नाही. यामुळे भविष्यात उत्तम रिटर्न्स मिळण्याची क्षमता अशा व्यवसायातील गुंतवणुकीत असते.
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP) दिल्ली, मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर, चंदीगड इत्यादी महत्वाच्या आणि मोठ्या शहरात रिअल इस्टेट क्षेत्रात बांधकाम आणि विकास हा प्रमुख व्यवसाय.फेस व्हॅल्यू : रुपये ५/-सध्याचा भाव : रु. १,२९३/-मार्केट कॅप : रु ३५ हजार ५०० कोटी.भाव पातळी : वार्षिक हाय रु २४८४/- आणि लो - ११२९/-बोनस शेअर्स : अद्याप दिले नाहीतशेअर स्प्लिट : नोव्हेंबर २०१३ मध्ये १:२ या प्रमाणातरिटर्न्स : गेल्या १० चौपट रिटर्न्स दिले आहेत.डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भविष्यात संधी : भारतात रियल इस्टेट हा व्यवसाय वाढत जाणार आहे. यामुळे कंपनीस चांगले भवितव्य असेल. त्याच बरोबर बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिटची संधी ही आहे.
G गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे : गेल इंडिया लि. ग्रासिम इंडस्ट्रीज, गुजरात स्टेट पेट्रोनेट लि., इत्यादी कंपन्यांमध्ये गुंतवणूक होऊ शकते.(टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.)pushkar.kulkarni@lokmat.comFollow : ww.lokmat.com/author/pushkarkulkarni