Join us

5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 5:30 PM

आजच्या सत्रात वित्तीय शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

Stock Market Highlights: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीला आज (26 एप्रिल) ब्रेक लागला. BSE सेन्सेक्स 609 अंकांनी घसरुन 73,730.16 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टी 150 अंकानी घसरुन 22,419.95 अंकांवर बंद झाला. आज वित्तीय शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. NSE वर बजाज फायनान्स सात टक्क्यांहून अधिक घसरला, तर टेक महिंद्राला सर्वाधिक फायदा झाला.

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे. मात्र, मिडकॅप शेअरमधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होऊनही मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे मार्केट कॅप विक्रमी पातळीवर पोहचले. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 404.22 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील ट्रेडिंग सत्रात 404.09 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 13 हजार कोटींची वाढ झाली आहे.

आजच्या सत्रात आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर शेअर्स तेजीत बंद झाले. तर, बँकिंग, वाहन, ऊर्जा, मेटल शेअर्सला तोटा झाला. आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा 7.43 टक्के, Divi's Lab 4.49 टक्के, LTI Mindtree 3.31 टक्के, Bajaj Auto 2.74 टक्के, BPCL 1 टक्के वाढीसह बंद झाले. तर, बजाज फायनान्स 7.73 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 3.52 टक्क्यांनी आणि नेस्ले 3.12 टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक