Stock Market Highlights: Closing Bell Today: मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज(गुरुवारी)
सेन्सेक्स 454 अंकांनी घसरुन 72,488 वर बंद झाला, तर निफ्टी 152 अंकांनी घसरुन 21,995 वर आला. बाजारात सर्वात जास्त विक्री FMCG क्षेत्रात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, नेस्ले इंडियात सर्वात मोठी घसरण झाली. फार्मा आणि बँकिंग क्षेत्रालाही ब्रेक लागला.
गुंतवणूकदारांना ₹ 38,000 कोटींच फटका
आजच्या घसरणीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 393.87 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग सत्रात, म्हणजे 16 एप्रिल रोजी 394.25 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 38,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 38,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्सचे सर्वाधिक वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आज बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त 7 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.97 टक्के वाढ झाली. यानंतर, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टाटा स्टील आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सर्वात जास्त वाढले. सेन्सेक्सच्या उर्वरित 23 शेअर्समध्ये मोठी घट पाहायला मिळाली. यामध्येही नेस्ले इंडियाचा शेअर 3.05 टक्क्याने घसरला. तर टायटन, ॲक्सिस बँक, एनटीपीसी आणि टाटा मोटर्सचे शेअर्स अनुक्रमे 1.46% आणि 2.94% च्या घसरणीसह लाल रंगात बंद झाले.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे, यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)