Join us  

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांनी छापले ₹ 2.11 लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 4:25 PM

शुक्रवारी सेन्सेक्स 72426 वर तर निफ्टी 22040 वर बंद झाले.

Stock Market Highlights: शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 376 अंकांनी वाढून 72426 वर पोहोचला तर निफ्टी 130 अंकांनी वाढून 22040 वर बंद पोहचला. या वाढीमुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 2.11 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आज पॉवर आणि युटिलिटी वगळता जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. 

आज ऑटो, फार्मा, आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक परिणाम दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचे निर्देशांकही अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 376.26 अंकांनी किंवा 0.52% च्या वाढीसह 72,426.64 अंकांवर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 121.85 अंक किंवा 0.56% टक्क्यांच्या वाढीसह 22,032.60 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी ₹2.11 लाख कोटी कमावलेआज 16 फेब्रुवारी रोजी BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 389.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे काल म्हणजेच 15 फेब्रुवारीला 387.30 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 2.11 लाख कोटी रुपयांनी वाढले. 

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे शेअरबीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.58% वाढ झाली आहे. यानंतर, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ होऊन 1.91% वरून 4.16% पर्यंत वाढले. 

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 शेअरउर्वरित 8 सेन्सेक्स शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीचे शेअर्स 2.50 टक्क्यांसह सर्वाधिक घसरले. तर HDFC बँक, पॉवर ग्रिड, टायटन आणि एशियन पेंट्सचे शेअर्स 0.43% ते 0.71% च्या घसरणीसह लाल रंगात बंद झाले.

(टीप: आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक