Stock Market Highlights: शेअर बाजाराच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजार किरकोळ घसरणीसह रेड झोनमध्ये उघडला. बीएसईवर सेन्सेक्स ८५ अंकांच्या घसरणीसह ७९,९१८.२६ वर उघडला. तर एनएसईवर निफ्टी ०.०८ टक्क्यांनी घसरून २४,१७४.०५ वर खुला झाला.
बाजार उघडताच महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, एनटीपीसी, बीपीसीएल आणि विप्रोचे शेअर्स निफ्टीवर तेजीसह व्यवहार करत होते, तर अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
ट्रेडिंग वीकच्या दुसऱ्या दिवशी रेड झोनमध्ये बंद झाला. बीएसईवर सेन्सेक्स १०५ अंकांनी घसरून ८०,००४.०६ वर बंद झाला. तर एनएसईवर निफ्टी ०.११ टक्क्यांनी घसरून २४,१९५.४५ वर बंद झाला. सुमारे २१७९ शेअर्स वधारले, तर १५८० शेअर्समध्ये घसरण दिसून आली आणि १०५ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
मंगळवारी निफ्टीवर ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, श्रीराम फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस यांचे समभाग सर्वाधिक वधारले, तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा आणि बजाज ऑटो यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी ग्रीन झोनमध्यये व्यवहार केला. ऑटो, पॉवर, फार्मा, ऑईल अँड गॅसमध्ये १ ते १.५ टक्के, तर एफएमसीजी, आयटी, मेटल मध्ये ०.५ ते १ टक्क्यांची घसरण झाली.