Share Market Crash : मागील अनेक दिवसांपासून तेजीत असणारा शेअर बाजार बुधवारी(दि.20) कोसळला. दिवसाच्या सुरुवातीला बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी रॉकेट वेगाने झेप घेतली, सेन्सेक्स-निफ्टीने नवीन शिखर गाठले. पण, व्यवहाराच्या शेवटच्या तासात बाजार अचानक कोसळला. बीएसई सेन्सेक्स 930 अंकांनी घसरून 70,506 वर आला, थर निफ्टीही 21,593 च्या विक्रमी उच्चांकावरून घसरला आणि 21,106 वर बंद झाला.
सेन्सेक्स 71,000 च्या खाली
बुधवारी शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकींग नोंदवण्यात आली. य प्रॉफिट बुकींगमुळे बीएसई सेन्सेक्स 71,000 च्या खाली आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21,106 अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. यामुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात 9 लाख कोटी रुपयांची घट झाली.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने जवळपास 450 अंकांची वाढ नोंदवली, निफ्टीनेही 21,593 ची पातळी गाठली. पण, दिवस संपेपर्यंत शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. BSE च्या 30 पैकी 29 शेअर्सने लाल चिन्ह गाठले होते, फक्त HDFCच्या शेअरमध्ये किंचित वाढ होताना दिसली. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीदरम्यान, एनटीपीसीचा शेअर 2.92 टक्क्यांनी घसरून 300.75 रुपयांच्या पातळीवर, एचसीएलटेकचा शेअर 2.97 टक्क्यांनी घसरून 1443.90 रुपयांच्या पातळीवर, एमअँडएमचा शेअर 3.20 टक्क्यांनी घसरून 1645.50 रुपयांवर, TAMOTORSचा शेअर 3.20 टक्क्यांनी 1645.50 रुपयांवर आला.
(टीप: शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. लोकमत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)