Stock Market Holiday List: आज आपल्याकडे होळीचा सण साजरा केला जाणार आहे. तर उद्या म्हणजेच १४ मार्च रोजी धुलिवंदन आहे. परंतु १४ मार्च रोजी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का बंद असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडलाय. १४ मार्च रोजी धुलिवंदनानिमित्त शेअर बाजाराचं कामकाज बंद राहणारे. शेअर बाजारांच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार १४ मार्च रोजी बीएसई आणि एनएसईमध्ये कामकाज होणार नाही.
ही सेगमेंट्स बंद राहतील
अधिकृत वेळापत्रकानुसार, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (एसएलबी) सेगमेंटसह महत्त्वाच्या सेगमेंटमधील ट्रेडिंग शुक्रवारी एक दिवस बंद राहणार आहे. याशिवाय धुलिवंदनामुळे करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट (ईजीआर) सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. दरम्यान, राष्ट्रीय आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शेअर बाजार बंद असतात.
२०२५ मध्ये शेअर बाजार केव्हा बंद राहणार?
शेअर बाजारात २०२५ या वर्षात एकूण १४ सुट्ट्या आहेत. यापूर्वी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज बंद होतं. चला तर मग जाणून घेऊया यंदा शेअर बाजाराला केव्हा सुट्टी असेल.
- १४ मार्च (शुक्रवार) - धुलिवंदन
- ३१ मार्च (सोमवार) - ईद-उल-फितर (रमजान ईद)
- १० एप्रिल (गुरुवार) - श्री महावीर जयंती
- १४ एप्रिल (सोमवार) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- १८ एप्रिल (शुक्रवार) - गुड फ्रायडे
- १ मे (गुरुवार) - महाराष्ट्र दिन
- १५ ऑगस्ट (शुक्रवार) - स्वातंत्र्य दिन
- २७ ऑगस्ट (बुधवार) - गणेश चतुर्थी
- २ ऑक्टोबर (गुरुवार) - महात्मा गांधी जयंती/ दसरा
- २१ ऑक्टोबर (मंगळवार) - दिवाळी (लक्ष्मीपूजन)
- २२ ऑक्टोबर (बुधवार) - बलिप्रतिपदा
- ५ नवंबर (बुधवार) - प्रकाश गुरुपर्व (श्री गुरु नानक देव जी जयंती)
- २५ दिसंबर (गुरुवार) - ख्रिसमस