Stock Market Holiday : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. BSE आणि NSE वर शेअर बाजारात कोणतेही व्यवहार या दिवशी होणार नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शेअर बाजाराने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकांचाही शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चलन बाजार आणि कमोडिटी एक्सचेंजवर देखील सुट्टीस्टॉक मार्केटचे दोन्ही एक्सचेंज म्हणजे बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात सुट्टी असेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या दिवशी एक्सचेंजमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. चलन बाजार आणि कमोडिटी एक्सचेंजेसवरील व्यवसायासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील राजकीय घडामोडींमुळे २० नोव्हेंबरला शेअर बाजार बंदराज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत झारखंड विधानसभा आणि उत्तर प्रदेशच्या ९ विधानसभा पोटनिवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून शेअर बाजाराचे कामकाज चालते. निवडणुकीमुळे २० नोव्हेंबरला शेअर बाजारात सुट्टी देण्यात आली आहे. या दिवशी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. तसेच मुंबईकर आणि राज्यातील रहिवाशांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आर्थिक कामाला थोडा विराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नोव्हेंबरमध्ये १२ दिवस शेअर बाजार बंद राहणारनोव्हेंबरमध्ये एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार असून यामागे सण आणि विशेष सुट्ट्या आहेत. दिवाळीनिमित्त शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराला सुट्टी होती. यानंतर गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवार १५ नोव्हेंबरला सुट्टी असेल. यानंतर बुधवार, २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. नोव्हेंबरमध्ये महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवारसह एकूण १२ दिवस शेअर बाजाराच्या सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.