मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 1053 अंकांच्या कमजोरीसह 70370 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 333 अंकांनी घसरून 21,238 अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे. मंगळवारी प्रॉफिट बुकींगमुळे रेल्वेच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे, म्युच्युअल फंड आणि FII नं झोमॅटोसह चार नव्या टेक कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे.
मंगळवारी कामकाजादरम्यान पीएसयू शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. कोल इंडिया, ओएनजीसी, एसबीआय लाईफ, बीपीसीएल आणि एसबीआयचे शेअर्स शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत समाविष्ट होते. मंगळवारी इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये 6.33 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं तर यामध्ये सन फार्मा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज, हिरो मोटोकॉर्प आणि अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्सचा समावेश होता.
शेअर बाजार निर्देशांकाबद्दल बोलायचं झालं तर निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक घसरून 46590 च्या पातळीवर आला होता. बीएसई स्मॉल कॅप 2.83 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण दिसून आली तर निफ्टी फार्मा निर्देशांक चांगली कामगिरी करत होता.
जोरदार विक्री
मंगळवारी शेअर बाजारात जोरदार विक्री नोंदवण्यात आली आणि 8 लाख कोटी रुपयांचे भांडवल कमी झाले. मंगळवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भांडवलात आठ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएससीमध्ये लिस्टेड शेअर्सचं मार्केट कॅप 366 लाख कोटी रुपये राहिलं.
शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स १००० अकांपेक्षा अधिक आपटला; 'या' शेअर्समध्ये घसरण, कोणते वधारले?
मंगळवारी कामकाजादरम्यान पीएसयू शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 04:11 PM2024-01-23T16:11:28+5:302024-01-23T16:12:16+5:30