Join us  

शेअर बाजारात गुंतवणूकदार मालामाल! तुम्हालाही घ्यायचाय फायदा? 'हा' फंड पाडेल पैशाचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:12 AM

Share Market Tips : हा फंड गुंतवणूकदारांना निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्समधील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो.

Share Market Tips : शेअर मार्केट हा पैशांचा समुद्र असल्याचे बोलले जाते. यातून कितीही पैसा काढला तरी कमी पडणार नाही अशीच अवस्था आहे. भारतीय शेअर बाजाराला तर सध्या सुगीचे दिवस आलेत. गुरुवारी सेन्सेक्स ऑलटाईम हायवर पोहचला. काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी ७ लाख कोटींची कमाई केली. अनेक शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर काही स्कॉक्स घसरल्याचेही पाहायला मिळाले. या उसळीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. यासाठी शेअर बाजारातील तज्ञांनी काही टीप्स दिल्या आहेत. 

तज्ञांचे म्हणणे आहे, की जेव्हा बाजारात चांगली वाढ होते तेव्हा स्मार्ट बीटा फंड बाजाराच्या वाढीचा फायदा घेण्यास मदत करतात. एनएसई डेटानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये परताव्याच्या बाबतीत ब्रॉड-बेस्ड निफ्टी 50 ने स्ट्रॅटेजी-बेस्ड निर्देशांकापेक्षा कमी कामगिरी केली. त्याउलट निफ्टी 50 ने 31% परतावा दिला आहे.

निफ्टी 500 व्हॅल्यू 50 सारख्या काही स्ट्रॅटेजी-बेस्ड इंडेक्स फंडांनी 65% परतावा दिला. निफ्टी अल्फा 50 ने 61% परतावा दिला आणि निफ्टी 100 अल्फा 30 ने 67% परतावा दिला. विशेष म्हणजे, निफ्टी लो वोलॅटिलिटी 50, निफ्टी 100 लो वोलॅटिलिटी 30 आणि निफ्टी क्वालिटी लो वोलॅटिलिटी 30 ने निफ्टी 50 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आणि ब्रॉड-आधारित निर्देशांकांपेक्षा कमी अस्थिरता आहे. स्मार्ट बीटा फंड गती, वोलॅटिलिटी, क्वालिटी आणि व्हॅल्यू स्ट्रॅटेजी वापरून स्टॉक्स निवडतात.

गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधीनिप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचा निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड एनएफओ 11 सप्टेंबर रोजी उघडला आणि 25 सप्टेंबर 2024 रोजी बंद होईल. या फंडाची स्ट्रॅटेजी 'कमी किमतीत खरेदी करा, जास्त किमतीत विक्री करा' यावर काम करते. निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स गुंतवणूकदारांना उच्च खरेदी आणि उच्च विक्री या धोरणाचा वापर करून मध्यम ते दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड निफ्टी 500 मोमेंटम 50 TRI ला ट्रॅक करते. ज्यामध्ये वोलॅटिलिटीसाठी समायोजित केलेल्या 6 आणि 12 महिन्यांच्या व्हॅल्यू रिटर्नच्या आधारे हाय स्कोअर टॉप 50 शेअर्सचा समावेश आहे. इंडेक्समध्ये 13 क्षेत्रातील स्टॉक्सचा समावेश आहे. दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये त्यांची पुनर्रचना केली जाते.

मोमेंटम फॅक्टरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर का आहे?ब्लू लेक कॅपिटल मॅनेजमेंटचे विशाल आहुजा म्हणतात, की हे निष्क्रिय गुंतवणूकीची वैशिष्ट्ये एकत्र करते. नियमावर आधारित असणे आणि अ‍ॅक्टीव गुंतवणूकीसह मोमेंटम फॅक्टर सारख्या तांत्रिक घटकांचा वापर करून निवड केली जाते. मोमेंटम इंडेक्स फंडांचे नियमन करणारे मूलभूत तत्त्व म्हणजे अलीकडच्या काळात शेअर्सने तुलनेने जोरदार कामगिरी केली आहे. याउलटही होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यात खूप मदत होते. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंडेक्समध्ये कमी तरलता असलेल्या स्टॉकचा समावेश नाही. ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटरोंचे तारण ठेवलेले स्टॉक 20% पेक्षा जास्त आहेत आणि नॉन-एफएन्डो स्टॉक्स ट्रेडिंग दिवसाच्या 20% पेक्षा जास्त सर्किट फिरतात. त्यांना देखील वगळण्यात आले आहे. ह्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अधिक सुरक्षित होण्यासोबत चांगल्या परताव्यांची शक्यता वाढते.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक