Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजार सुस्साट... १००००० अंकांपर्यंत जाणार Sensex, एक्सपर्ट्सनं सांगितलं किती वेळ लागणार?

शेअर बाजार सुस्साट... १००००० अंकांपर्यंत जाणार Sensex, एक्सपर्ट्सनं सांगितलं किती वेळ लागणार?

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतालाच आपली पसंती असल्याचे ते म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:51 PM2024-04-10T15:51:54+5:302024-04-10T15:52:32+5:30

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतालाच आपली पसंती असल्याचे ते म्हणाले.

Stock market is booming Sensex will go up to 100000 points expert mark mobius said how long will it take | शेअर बाजार सुस्साट... १००००० अंकांपर्यंत जाणार Sensex, एक्सपर्ट्सनं सांगितलं किती वेळ लागणार?

शेअर बाजार सुस्साट... १००००० अंकांपर्यंत जाणार Sensex, एक्सपर्ट्सनं सांगितलं किती वेळ लागणार?

जगभरातील उदयोन्मुख शेअर बाजारांमध्ये मोठी गुंतवणूक करणारे दिग्गज गुंतवणूकदार मार्क मोबियस भारतीय शेअर बाजारावर बुलिश दिसत आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये शेअर बाजार १ लाखांची पातळी गाठू शकतो, असं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. परंतु आता त्यापूर्वीच भारतीय शेअर बाजार ही पातळी गाठू शकतो, असं त्यांनी म्हटलंय.
 

यावेळी त्यांनी भारतीय बाजारात तेजी का आहे आणि निवडणुकीनंतर शेअर बाजारात किती मोठी वाढ दिसून येऊ शकते, यावरही भाष्य केलं. मार्क मोबियस यांनी CNBC-TV18 शी केलेल्या खास संवादात ही माहिती दिली. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतालाच आपली पसंती असल्याचे ते म्हणाले. भारताबाबात आपण खूप उत्साही आहोत. या ठिकाणी दीर्घकालीन अनेक संधी उपलब्ध आहेत. इथे येणारा काळ उत्पादन आणि निर्यातीचा असणार आहे, असं मोबियस म्हणाले.
 

भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय 
 

दरम्यान, त्यांना भारतातील लोकसभा निवडणुकांबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. "नरेंद्र मोदींच्या वाढत्या शक्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, हे देखील समजून घेतले पाहिजे की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, ज्याची निवडणूक प्रक्रिया अत्यंत अतुलनीय आहे. जगभरातील बहुतांश गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत आहे. चीनमधील गुंतवणुकीमुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत तार्किकदृष्ट्या भारत हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं दिसतं," असं ते म्हणाले.

Web Title: Stock market is booming Sensex will go up to 100000 points expert mark mobius said how long will it take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.