Join us

Stock Market Live today : शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात, सेन्सेक्स ७२,१०० तर, निफ्टी २१,७५० पार खुला  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:11 AM

शुक्रवारी शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात झाली.

Stock Market Live today 12 January: शेअर बाजाराची आज धमाकेदार सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 426 अंकांच्या उसळीसह 72148 च्या पातळीवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य संवेदनशील निर्देशांक निफ्टी 126 अंकांनी वाढून 21773 च्या पातळीवर खुला झाला. 

यापूर्वी गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला होता. असं असूनही, शुक्रवारी आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली. गिफ्ट निफ्टीचा ट्रेंडही भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी चांगली सुरुवात दर्शवत होता, परंतु आज देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या टीसीएस आणि इन्फोसिसच्या तिमाही निकालांचा परिणाम सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून येऊ शकतो. या दोन्ही शेअर्स गुंतवणूकदारांची नजर आहे.

कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ होऊन घेऊन इन्फोसिस 1556 रुपयांवर पोहोचला. तिमाही निकालानंतर टीसीएसचे शेअर्सही 2.80 टक्क्यांनी वाढून 3841 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. या दोन मोठ्या आयटी कंपन्यांसोबतच विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक या कंपन्यांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झाले तर गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ८ लिस्टेड कंपन्यांचे समभाग घसरले. अदानी टोटलच्या शेअरमध्ये आज वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार