Stock Market Opening Bell: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 218 अंकांच्या वाढीसह 74466 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64 अंकांच्या वाढीसह 22578 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीला, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ झाली.
शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर या यादीत कोटक बँक, एसबीआय लाईफ, एचडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्सचा समावेश आहे, तर टॉप लुझर्सच्या यादीत भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक, डिवीज लॅब, आयशर मोटर्स, अदानी पोर्ट्स यांचा समावेश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल सांगायचं झालं तर हिंदुस्तान झिंक, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, टाटा कंझ्युमर, इन्फोसिस लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ओएनजीसी आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स वधारले. तर विप्रो लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
अदानींच्या शेअर्सची स्थिती
शेअर बाजारातील तेजीदरम्यान गौतम अदानी समूहाच्या ९ लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात किंचित घसरणीसह ट्रेड करत होते.
सोमवारी शेअर बाजारातील व्यवहार सकारात्मकतेनं सुरू होण्याची अपेक्षा होती. प्री-ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 346 अंकांच्या वाढीसह 74594 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 68 अंकांच्या वाढीसह 22581 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजारातील कामकाज सकारात्मकतेनं सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते.