Join us  

Stock Market:टाटा समुहाच्या या शेअरचा बाजारात बोलबाला, खरेदी केल्यास देऊ शकतो बंपर फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 9:51 AM

Stock Market: टाटा मोटर्सचा शेअर सध्या शेअर बाजारात भाव खात आहे. ग्लोबल ब्रोकरेज जेफरीजने या शेअरमध्ये पैसे गुंतवून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई - जर तुम्ही नेहमी शेअर बाजारामध्येगुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी फायद्याची बातमी आहे. तुम्ही टाटा ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. टाटा मोटर्सचा शेअर सध्या शेअर बाजारात भाव खात आहे. ग्लोबल ब्रोकरेज जेफरीजने या शेअरमध्ये पैसे गुंतवून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

जेफरीजकडून टाटा मोटर्सच्या शेअरला बाय रेटिंग देण्यात आली आहे. सोमवारी बंद झालेल्या व्यावहारिक सत्रात टाटा मोटर्सचा शेअर ३९७.५० रुपयांवर बंद झाला. इलेक्ट्रॉनिक व्हेईकल बनवणारी प्रमुख ऑटो निर्माता कंपनी टाटा मोटर्सवर ब्रोकरेज फर्म्सनी आपलं लक्ष वळवलं आहे. कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक कारचे अनेक सेगमेंट सादर करण्यात आले आहेत. कंपनीने आपली बेस व्हेरिएंट टियागोचे इलेक्ट्रॉनिक व्हर्जनसुद्धा सादर केले आहे. 

कंपनीकडून इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये लॉन्च होणारी ही पहिली हेचबॅक कार आहे. एकूणच टाटाची ही तिसरी इलेक्ट्रॉनिक कार आहेत. ब्रोकरेज फर्मनी इलेक्ट्रिक व्हेईकलची वाढती डिमांड असताना टाटा मोटर्सला ५४० रुपयांची टार्गेट प्राइस देण्यात आली आहे. टाटा इलेक्ट्रिक व्हेईकलच्या उपलब्धतेला १६५ शहरांपर्यंत वाढवले आहे. टाटा मोटर्सकडून टियागो इव्ही पहिल्या १० हजार ग्राहकांसाठी ८.४९ लाख रुपयांच्या किमतीवर लॉन्च करण्यात आले होते.

टाटा मोटर्सचा शेअर सध्या ४०० रुपयांच्या स्तरावर आहे. सोमवारी बंद झालेल्या सत्रामध्ये तो ३९७.५० रुपयांवर बंद झाला होता. या दरम्यान, त्याने ४०५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. या शेअरचा ५२ आठवड्यांमधील उच्चांक ५३६.७० रुपयांचा आहे. तर गेल्या ५३ आठवड्यांमधील निचांक हा ३३५ रुपये आहे. १.४२ लाख कोटी रुपये कॅपिटलयझेशन असलेल्या या कंपनीच्या शेअरसाठी एक्स्पर्टस उत्सुक दिसत आहेत. (कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. लोकमत कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला सल्ला देत नाही)

टॅग्स :टाटाशेअर बाजारगुंतवणूक