शेअर बाजारात मिड ईस्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक आहे. या स्टॉकमध्ये या वर्षात आतापर्यंत जबरदस्त तेजी दिसून आली आहे. हा शेअर सातत्याने बक्कळ परतावा देत आहेत. आज सोमवारी, या शेअरला 5% चे अपर सर्किट लागले आणि शेअर BSE वर 9.07 रुपयांवर पोहोचला.
हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. या स्टॉकने गेल्या 18 व्यवहारांच्या दिवसांत तब्बल 100% हूनही अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या महिन्यात 16 जानेवारीला या शेअरची किंमत 4 रुपये होती. महत्वाचे म्हणजे, 2.80 रुपये हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. गेल्या वर्षी 11 एप्रिलला हा शेअर या नीचांकावर पोहोचला होता.
यावर्षात आताप्यंत दिलाय 117% परतावा -
मिड ईस्ट पोर्टफोलियो मॅनेजमेंटच्या शेअरने या वर्षात आतापर्यंत 117% चा परतावा दिला आहे. गेल्या केवळ तीन महिन्यांतच हा शेअर 126% हून अधिकने वधारला आहे. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 151.40% चा परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 4.53 कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)