Stock Market Multibagger Share : केमिकल उद्योगाशी संबंधित कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. गेल्या काही वर्षांत आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत 7 रुपयांवरून 700 रुपयांपेक्षाही अधिक झाली आहे. आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी या कालावधीत लोकांना 10000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1168.40 रुपये आहे. त्याच वेळी, आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 669 रुपये आहे.
20 फेब्रुवारी 2009 रोजी मुंबई शेअर बाजारावर (BSE) आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स 6.98 रुपयांच्या पातळीवर होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 790.95 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 20 फेब्रुवारी 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्याच्या या पैशांचं मूल्य 1.1 कोटी रुपये झाले असते.
24 ऑगस्ट 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स 17.84 रुपयांच्या पातळीवर होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 790.95 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल तर त्याचं मूल्य आज 44.47 लाख रुपये झाले असते.
आजवर 30 हजार टक्क्यांचे रिटर्न
आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सने सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना 30,731 टक्क्यांचे रिटर्न दिले आहे. 14 जुलै 1995 रोजी बीएसईवर आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स 2.56 रुपये होते, ते आता 790.95 रुपये झाले आहेत. केमिकल कंपनीच्या या शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत जवळपास 260 टक्के रिटर्न दिले आहेत. त्याच वेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स सुमारे 23 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. (टीप- कोणतीही गुंतवणूक करताना या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)