Join us

Stock Market News: Sensex ५८५ अंकांनी आपटला, Niftyमध्येही घसरण; गुंतवणूकदारांचे ₹३.२८ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:05 AM

Stock Market News: अर्थसंकल्पातील कॅपिटल गेन प्रणालीतील बदलातून बाजार अद्याप सावरलेला नाही, जागतिक बाजारातील जोरदार विक्रीमुळे आणखी दबाव निर्माण झाला.

Stock Market News: अर्थसंकल्पातील कॅपिटल गेन प्रणालीतील बदलातून बाजार अद्याप सावरलेला नाही, जागतिक बाजारातील जोरदार विक्रीमुळे आणखी दबाव निर्माण झाला. जागतिक बाजारातील विक्रीच्या संकेतांमुळे देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये आहेत. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून येतोय. एकूणच या विक्रीच्या दबावाखाली बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ३.२८ लाख कोटी रुपयांनी कमी झालंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२८ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ५८४.७७ अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी ५० १७१.४० अंकांनी म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून २४,२४२.१० वर बंद झाला आहे. बुधवारी सेन्सेक्स ८०,१४८.८८ आणि निफ्टी २४,४१३.५० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घसरण

एक दिवसापूर्वी म्हणजे २४ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,४९,४७,५५२.६३ कोटी रुपये होतं. आज २५ जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,४६,१९,१९९.९२ कोटी रुपयांवर आला. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ३,२८,३५२.७१ कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्सचे ४ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड आहेत, त्यापैकी फक्त ४ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. एल अँड टी, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले या कंपन्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे अॅक्सिस बँक, टाटा स्टील आणि पॉवरग्रिडचे शेअर्स सर्वाधिक घसरले. 

टॅग्स :शेअर बाजार