Stock Market News: कॅपिटल गेन आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) वरील करवाढीमुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात घसरण झाली. बहुतांश क्षेत्रात विक्रीचा दबाव होता. आजच्या कामकाजाबद्दल बोलायचं झालं तर अजूनही विक्रीचा दबाव कायम आहे. जागतिक पातळीवरील कमकुवत संकेतांमुळे देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीदेखील कमकुवत दिसत आहेत.
मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे. एकूणच या ट्रेंडमध्ये बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ९२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या २१५ अंकांनी वाढून ८०,२१३ वर आणि निफ्टी ५० ४२ अंकांनी घसरून २४,४३६ वर कामकाज करत आहे. मंगळवारी सेन्सेक्स ८०,४२९.०२ वर आणि निफ्टी २४,४७९.०५ वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली
एक दिवसापूर्वी म्हणजे २३ जुलै रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४,४६,४०,८७७.८२ कोटी रुपये होते. आज २४ जुलै रोजी बाजार उघडताच ते ४,४७,३२,९५१.७४ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९२,०७३.९२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे ९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी ९ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. आयटीसी, टायटन आणि एअरटेलमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि नेस्ले यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर दुसरीकडे एनटीपीसी, टेक महिंद्रा, एल अँड टी, टाटा मोटर्स, टीसीएस यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.