Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market News Today : तेजीसह उघडले Sensex-Nifty, गुंतवणूकदारांनी कमावले ₹२.४६ लाख कोटी

Stock Market News Today : तेजीसह उघडले Sensex-Nifty, गुंतवणूकदारांनी कमावले ₹२.४६ लाख कोटी

Stock Market News Today : जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:50 AM2024-08-19T09:50:44+5:302024-08-19T09:51:16+5:30

Stock Market News Today : जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून येत आहे.

Stock Market News Sensex Nifty opens with gains investors earn rs 2 46 lakh crore | Stock Market News Today : तेजीसह उघडले Sensex-Nifty, गुंतवणूकदारांनी कमावले ₹२.४६ लाख कोटी

Stock Market News Today : तेजीसह उघडले Sensex-Nifty, गुंतवणूकदारांनी कमावले ₹२.४६ लाख कोटी

Stock Market News:  जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी क्षेत्राचे सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप २.४६ लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.४६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या २१३.०९ अंकांनी वाढून ८०,६४९.९३ वर आणि निफ्टी ५० ८४.१५ अंकांनी वाढून २४,६२५.३० वर होता. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स ८०,४३६.८४ वर आणि निफ्टी २४,५४१.१५ वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.४६ लाख कोटींची वाढ

एक दिवसापूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५१,५९,८३३.५५ कोटी रुपये होते. आज १९ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५४,०६,०८२.९९ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २,४६,२४९.४४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे २२ शेअर ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २२ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एनटीपीसी, अल्ट्राटेक आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे टीसीएस, इन्फोसिस आणि मारुतीचे शेअर्स सर्वाधिक घसरले. याशिवाय रिलायन्स, आयटीसी, अदानी पोर्ट्स, पॉवरग्रीड, जेएसडब्ल्यू स्टील्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय बँक, एशियन पेट्स, टायटन या कंपन्यांच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली.

Web Title: Stock Market News Sensex Nifty opens with gains investors earn rs 2 46 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.