Stock Markets : आठवड्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने पुन्हा एका गुंतवणूकदारांना निराश केलं. सोमवारी (१६ डिसेंबर) देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये संमिश्र संकेत असताना व्यवहार लाल रंगात सुरू झाले आहेत. बेंचमार्क निर्देशांक किंचित घसरणीसह उघडले. सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरला आणि ८२,००० वर उघडला. निफ्टी १५ अंकांनी घसरून २४,७५३ वर तर बँक निफ्टी ८१ अंकांनी घसरून ५३,५०२ वर उघडला. निफ्टीवर आयटी, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, प्रायव्हेट बँक निर्देशांकात घसरण झाली. पण रिॲल्टी निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक होता. त्याचवेळी मीडिया, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या निर्देशांकात तेजीसह व्यवहार झाले.
आयटी, मेटल, तेल आणि वायूमध्ये घसरण
सेक्टरनुसार, रियल्टी निर्देशांक ३ टक्के, मीडिया निर्देशांक १.५ टक्के आणि PSU बँक निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढले, तर आयटी, धातू, तेल आणि वायू ०.५-१ टक्क्यांनी घसरले. निफ्टीमध्ये सिप्ला, हिंदाल्को, आयटीसी, एलटी, रिलायन्स हे सर्वाधिक वाढले. दरम्यान, टायटन, बीपीसीएल, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
या आठवड्यात बाजारातून सकारात्मक व्यवहार अपेक्षित आहे. शुक्रवारच्या नेत्रदीपक वाढीमध्ये एफआयआयने जोरदार पुनरागमन केले. रोख, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्सची खरेदी १०५७५ कोटी रुपयांची होती. आज सकाळी गिफ्ट निफ्टी ५० घसरला. शुक्रवारी अमेरिकन बाजारातही संमिश्र वातावरण राहिले. नॅस्डॅकने इंट्राडे लाइफ टाइम उच्चांक गाठला आणि तो २५ अंकांनी वाढून बंद झाला, तर डाऊ ८५ अंकांनी घसरला आणि ४ वर्षांत पहिल्यांदाच सलग ७व्या दिवशी कमजोर राहिला. GIFT निफ्टी ४० अंकांनी घसरला आणि २४८०० च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी तर निक्की १५० अंकांनी वधारले होते.