Join us  

Stock Market on Budget Day: अर्थसंकल्पाच्या दिवशी Sensex-Niftyची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, गुंतवणूकदारांनी ₹१.६२ लाख कोटी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 9:41 AM

Stock Market on Budget Day: एकीकडे २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादर होणार आहे तर दुसरीकडे जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज देशांतर्गत शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह उघडले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे.

Stock Market on Budget Day: एकीकडे २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादर होणार आहे तर दुसरीकडे जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज देशांतर्गत शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह उघडले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप १.६२ लाख कोटी रुपयांनी वाढलंय. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.६२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या १७१.२४ अंकांनी वाढून ८०,६७३.३२ वर आणि निफ्टी५० हा ४६.७० अंकांनी वाढून २४,५५५.९५ वर आहे. यापूर्वी सोमवारी सेन्सेक्स ८०,५०२.०८ वर आणि निफ्टी २४,५०४.२५ वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांनी १.६२ लाख कोटी कमावले

एका दिवसापूर्वी म्हणजे २२ जुलै २०२४ रोजी बीएसईवरील सर्व लिस्टेड शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ४,४८,३२,२२७.५० कोटी रुपये होते. आज २३ जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,४९,९५,०८२.६६ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,६२,८५५.१६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे २५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. अल्ट्राटेक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एचयूएलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, एचसीएल, एचडीएफसी बँक आणि पॉवरग्रिडचे शेअर्स सर्वाधिक घसरले. अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, नेस्ले, टाटा स्टील, कोटक बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, आयटीसी यामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार