Join us

Stock Market Open: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; टाटा टेकचे शेअर्स वधारले, पॉवर ग्रिडमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 9:53 AM

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी वाढीसह सुरू झालं.

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी वाढीसह सुरू झालं. कामकजादरम्यान बीएसई सेन्सेक्स 132 अंकांनी 73,162 च्या पातळीवर, तर निफ्टी 43 अंकांच्या तेजीसह अंकांनी वर 22239.90 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक निर्देशांक तेजीत होते तर, निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते.  

बुधवारी निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही वाढ झाली. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर टाटा टेक, एनटीपीसी, कोल इंडिया, बजाज ऑटो आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

बुधवारी, गिफ्ट निफ्टीकडून शेअर बाजाराचं कामकाज सकारात्मक सुरू होऊ शकतं असे संकेत मिळाले होते. आशियाई शेअर बाजारात मात्र घसरणीसह कामकाज सुरू होतं. शेअर बाजार सातत्यानं नवनवीन विक्रमांच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. निफ्टीनं 22237 चा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे तर सेन्सेक्सनं 73000 चा टप्पा ओलांडला आहे. 

गिफ्ट निफ्टी बुधवारी 22 अंकांच्या वाढीसह 22,256 अंकांच्या पातळीवर काम करत होता. बुधवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 164 अंकांनी वाढून 73221 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 13 अंकांनी घसरून 22184 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार