मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 330 अंकांनी वधारून 66,465 च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी सुमारे 84 अंकांनी वधारून 19815 च्या पातळीवर काम करत होता. प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स 230 अंकांच्या वाढीसह काम करत होता तर निफ्टीनं 19840 ची पातळी ओलांडली होती.
"मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 87 डॉलर्सच्या खाली आल्या आहेत आणि त्यामुळे निफ्टी ग्लोबल स्टॉक मार्केटच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकेल अशी अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया मेहता इक्विटीजचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट प्रशांत तापसे यांनी दिली.
सोन्याची चमक झाली कमी
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. COMEX वर सोन्याची किंमत 1,908 डॉलर्सपर्यंत घसरली. बॉन्ड यील्ड आणि डॉलरच्या वाढीमुळे सोन्यावर दबाव दिसून येत आहे. सोन्याच्या किमतीत 3 दिवसात सुमारे 1 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गेल्या आठवड्यात किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढल्या होत्या.
Stock Market Open: सेन्सेक्समध्ये ३००, निफ्टीत ८४ अंकांची तेजी; HDFC वधारला, ONGC मध्ये घसरण
मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:43 AM2023-10-17T09:43:22+5:302023-10-17T09:43:32+5:30