Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Open: शेअर बाजाराची तेजीनं सुरूवात, १५० अंकांची वाढ; 'या' शेअर्समध्ये तेजी

Stock Market Open: शेअर बाजाराची तेजीनं सुरूवात, १५० अंकांची वाढ; 'या' शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरूवात तेजीनं झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:17 AM2023-06-19T10:17:49+5:302023-06-19T10:18:09+5:30

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरूवात तेजीनं झाली.

Stock Market Open share market starts on a high note up by 150 points Bullish in these shares ultratech bajaj finserv shriram finance | Stock Market Open: शेअर बाजाराची तेजीनं सुरूवात, १५० अंकांची वाढ; 'या' शेअर्समध्ये तेजी

Stock Market Open: शेअर बाजाराची तेजीनं सुरूवात, १५० अंकांची वाढ; 'या' शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरूवात तेजीनं झाली. सकाळी  09:17 वाजता बीएसई सेन्सेक्स 149.89 अंकांच्या किंवा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 63,534.47 अंकांवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 41.05 अंकांच्या म्हणजेच 0.22 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. कामकाजाच्या सुरूवातीच्या टप्प्यात श्रीराम फायनान्सचे शेअर्स चार टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.

या शेअर्समध्ये तेजी
कामकाजादरम्यान बजाज फिनसर्व्हचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 0.89 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.75 टक्के, सन फार्मामध्ये 0.72 टक्के, लार्सन अँड टुब्रोमध्ये 0.70 टक्के, टायटनमध्ये 0.67 टक्के, टाटा स्टीलमध्ये 0.61 टक्के, एशियन पेंट्समध्ये 0.61 टक्के, नेस्ले इंडियामध्ये 0.59 टक्के, पॉवरग्रीड 0.49 टक्के, एचडीएफसी आय 0.49 टक्के आणि एचडीएफसीच्या शेअरमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ झाली.

या शेअर्समध्ये घसरण
एनटीपीसी, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल या कंपनीच्या शेअर्समध्ये कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात घसरण दिसून आली.

आशियाई शेअर बाजारांची सावध सुरुवात
गेल्या आठवड्यात आशियाई शेअर बाजारानं गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक तेजी पाहिली. मात्र, सोमवारी आशियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सावध पवित्रा घेतला. याचं कारण गुंतवणूकदार व्याजदरांबाबत चीनच्या निर्णयाची आणि यूएस फेड रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या पुढील गाईडलाईन्सची वाट पाहत आहेत.

Web Title: Stock Market Open share market starts on a high note up by 150 points Bullish in these shares ultratech bajaj finserv shriram finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.