Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात IT इंडेक्समध्ये मोठी घसरण; TCS-Infy आणि विप्रोच्या शेअर्सचं काय झालं?

शेअर बाजारात IT इंडेक्समध्ये मोठी घसरण; TCS-Infy आणि विप्रोच्या शेअर्सचं काय झालं?

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आज कमजोर सुरुवात झाली असून बाजार उघडताच शेअर बाजारात आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 09:42 AM2024-09-18T09:42:43+5:302024-09-18T10:11:51+5:30

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आज कमजोर सुरुवात झाली असून बाजार उघडताच शेअर बाजारात आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

stock market opening 18 september it stocks decline 1 5 percent it index down tcs infosys wipro down | शेअर बाजारात IT इंडेक्समध्ये मोठी घसरण; TCS-Infy आणि विप्रोच्या शेअर्सचं काय झालं?

शेअर बाजारात IT इंडेक्समध्ये मोठी घसरण; TCS-Infy आणि विप्रोच्या शेअर्सचं काय झालं?

Stock Market Opening: आठवड्याची दमदार सुरुवात करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात आज शांतता पसरली आहे. बाजार उघडताच शेअर बाजारात आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आयटी शेअर्समध्ये मोठा दबाव होता. निफ्टीवर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये आयटी शेअर्सचा समावेश होता. त्याचवेळी एफएमसीजी शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी दिसून आली. हिरो मोटोकॉर्प, युनायटेड स्पिरिट्सने एका वर्षातील उच्चांक गाठला आहे. तर बीएसईचे शेअर्स प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर्स सुरुवातीच्या काही मिनिटांत वधारत आहेत. अमेरिकेतील फेडरल बँकेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाजार सावध झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बँक निफ्टीने दिली साथ
बाजार उघडल्यानंतर ४५ मिनिटांनी सेन्सेक्स वाढीवर परतला आहे. निफ्टी देखील २५४०० च्या वर आहे, जो त्याच्या मंगळवारच्या पातळीच्या आसपास आहे. बँक निफ्टीने स्पष्टपणे बाजाराला दिलासा दिला असून आयटी शेअर्सच्या घसरणीनंतर बँक शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे शेअर बाजाराला दिलासा मिळाला आहे. आज एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेसह अनेक खासगी बँकांचे शेअर्स मजबूत दिसत आहेत. बँक निफ्टीचा तेजीचा कल असा आहे की त्याच्या 12 पैकी 11 शेअर्स वाढत आहेत आणि केवळ ॲक्सिस बँकेच्या शेअरमध्ये घसरण होत आहे.


बाजाराची सुरुवात कशी झाली?
BSE सेन्सेक्स ४२.५२ अंकांच्या घसरणीसह ८,०३७ वर उघडला तर निफ्टी १६.१५ अंक किंवा २५,४०२ च्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात दाखवत आहे. आज ओएनजीसीचे शेअर्स एक टक्क्याने वर उघडले होते, जे बाजार उघडल्यानंतर अर्ध्या टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. बजाज हाऊसिंगमध्ये ब्लॉक डील झाला आहे. पण लिस्ट झाल्यानंतर हा पहिलाच दिवस आहे, जेव्हा शेअर काहीसा शांतपणा दाखवत आहे.


सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सचे अपडेट
सकाळी ९.४० वाजता बीएसई सेन्सेक्स शेअर्समध्ये ग्रीन सिग्नल दिसत होता. घसरणाऱ्या शेअर्समध्ये आयटी शेअर्सचा मोठा वाटा दिसत आहे. आज आयटी शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमागे एक्सेंचर हे मुख्य कारण असल्याचे पाहिले जात आहे. आयटी सेन्सेक्स सुमारे २.५० टक्क्यांनी घसरला आहे.


निफ्टी शेअर्सचे अपडेट
सकाळी ९.४० वाजता NSE निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३२ शेअर्समध्ये वाढ आणि १८ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज निफ्टी शेअर्समध्ये सर्वाधिक लाभ मिळवणाऱ्यांमध्ये हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे आणि हे पाच स्टॉक्स टॉप ५ मध्ये आहेत.

FMCG शेअर्समध्ये वाढीचा कल कायम
सध्या जर आपण एफएमसीजी शेअर्स बघितले तर आयटीसी, एचयूएल आणि ब्रिटानिया शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आज नेस्लेही या वाढीला हातभार लावत आहे.
 

Web Title: stock market opening 18 september it stocks decline 1 5 percent it index down tcs infosys wipro down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.