Join us

Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 9:58 AM

Stock Market Opening Bell: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसई सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये ४८ अकांची वाढ होऊन तो ७५,४४६ अंकांवर कार्यरत होता. तर निफ्टीमध्ये थोडी घसरण दिसून आली.

Stock Market Opening Bell: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसई सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये ४८ अकांची वाढ होऊन तो ७५,४४६ अंकांवर कार्यरत होता. तर निफ्टीमध्ये थोडी घसरण दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीनंतर आज बाजार थोडा सावल्याचं दिसून आलं. निफ्टीनं २३ हजारांची पातळी गाठली, मात्र नंतर त्यात घसरण दिसून आली. बाजारात प्रॉफिट बुकिंगचा दबाव दिसून आला. 

यादरम्यान बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ३९.७ हजार कोटींनी कमी झालं. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३९.७ हजार कोटी रुपयांची घट झाली. एका दिवसापूर्वी म्हणजे २३ मे रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४,२०,२२,६३५.९० कोटी रुपये होतं. आज २४ मे रोजी बाजार उघडताच ते ४,१९,८२,९१०.४४ कोटी रुपये झालं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ३९,७२५.४६ कोटी रुपयांची घट झाली. 

१९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये 

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १० शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. अॅक्सिस बँक, एनटीपीसी आणि नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. दुसरीकडे टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.  

एसबीआय, टायटन, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, रिलायन्स, एचसीएल टेक, टाटा स्टील, आयसीआयसीआय, पॉवरग्रिड. जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार