Join us  

Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:39 AM

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात घसरण दिसून येत आहे. टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि पॉवरग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. 

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी मोठी घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे. दरम्यान, क्षेत्रीय निर्देशांक फार्मा आणि एफएमसीजी शेअर्स शेअर बाजाराला सावरण्याचा प्रयत्न करत असले तरी इतर सेक्टरकडून त्याला सपोर्ट मिळत नाहीये. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप साडेसात हजार कोटी रुपयांनी घसरलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 47.5 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. 

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर बीएसई सेन्सेक्स 148.36 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 72516.11 वर आणि निफ्टी 50 19.65 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 22035.55 ट्रेड करत होता. यानंतर त्यात आणखी घसरण दिसून आली. एक दिवसापूर्वी सेन्सेक्स 72664.47 वर आणि निफ्टी 22055.20 वर बंद झाला होता. 

गुंतवणूकदारांचे 47.5 कोटी बुडाले 

एका दिवसापूर्वी म्हणजेच 10 मे 2024 रोजी बीएसईवरील सर्व लिस्टेड शेअर्सचं एकूण मार्केट कॅप 3,96,56,440.83 कोटी रुपये होते. आज 13 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 3,96,08,883.16 कोटी रुपये झालं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात 47,557.67 कोटी रुपयांची घट झाली आहे. 

सेन्सेक्सचे 7 शेअर्स ग्रीन झोनमध्ये 

सेन्सेक्समध्ये 30 शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी फक्त 7 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. सन फार्मा, एचयूएल आणि आयटीसी सर्वाधिक वेगाने वाढत आहेत. दुसरीकडे टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि पॉवरग्रिडचे शेअर्स सर्वाधिक घसरले. 

टॅग्स :शेअर बाजार