Join us  

Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:11 AM

Stock Market Opening: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी बाजारात तेजीचा कल दिसून येत आहे.

Stock Market Opening: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी बाजारात तेजीचा कल दिसून येत आहे. निफ्टीनं सोमवारी रेंज दाखवली असली तरी आज निफ्टी ३३ अंकांनी वधारून २५४१७ च्या पातळीवर उघडला. तर सेन्सेक्सही ९५ अंकांनी वधारून ८३०८४ च्या पातळीवर पोहोचला होता.

जागतिक बाजारातून व्याजदर कपातीसंदर्भातील अनुकूल बातम्या आल्यास निफ्टी २५६०० पर्यंत जाऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. फेडच्या बैठकीच्या अपडेट्सनंतर निफ्टीने चांगल्या व्हॉल्यूमसह २५६०० ची पातळी ओलांडली तर बाजारात त्यात आणखी तेजी येऊ शकते तो २५८०० च्या पातळीपर्यंत जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

एफएमसीजी शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया, टाटा कन्झ्युमर, आयटीसी, भारती एअरटेल आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे ऑटो निर्देशांकात विक्री दिसून येत आहे. निफ्टी ५० निर्देशांकातून टाटा मोटर्स, आयशर मोटर्समध्ये विक्रीचा कल दिसून आला.

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

फॅन्सिन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयापूर्वी चीनच्या मागणीबाबत सुरू असलेल्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा नोव्हेंबरमधील वायदा भाव १.१४ डॉलर म्हणजेच १.५९ टक्क्यांनी वधारून ७२.७५ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला. ऑक्टोबरमधील अमेरिकन क्रूड फ्युचर्स १.४४ डॉलर म्हणजेच २.१ टक्क्यांनी वधारून ७०.०९ डॉलरवर बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी / घसरण?

 

टॅग्स :शेअर बाजार