Join us  

Stock Market Opening : वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ६० हजारांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 11:22 AM

२०२२ च्या अखेरच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा खरेदी दिसून आली.

Stock Market Opening : जागतिक बाजारपेठांधील संमिश्र संकेतांदरम्यानच २०२२ च्या अखेरच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा खरेदी दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकात पुन्हा वाढ झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये सोमवारी वाढ दिसून आली. निफ्टी १७९५० अकांच्या जवळ पोहोचला. तर सेन्सेक्सध्ये ४५० अंकांची वाढ झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात विक्री दिसून आली होती. सोमवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४७२ अकांची तेजी दिसून आली. त्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक ६०,३१७.३४ वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये १३६ अंकांची वाढ होईन तो १७,९४३ अंकांवर पोहोचला.

कोणत्या क्षेत्रात तेजी?सोमवारी कामकाजादरम्यान प्रमुख सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीवर बँक, ऑटो आणि फायनॅन्शिअल इंडेक्समध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. मेटल आणि रियल्टी इंडेक्समध्ये १.५ टक्क्यांची तेजी होती. तर आयटी आणि एफएमजीसीच्या शेअर्समध्ये अर्ध्या टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. परंतु फार्मा इंडेक्समध्ये मात्र विक्रीचा जोर दिसून आला. टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, एम अँड एम च्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. तर सन फार्माचा शेअर सर्वाधिक घसरला.

टॅग्स :शेअर बाजार