Join us  

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 9:49 AM

Stock Market Opening: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह सुरू झालं. निफ्टीनं ५८ अंकांच्या वाढीसह २५१८६ च्या पातळीवर व्यवहार करण्यास सुरुवात केली.

Stock Market Opening: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह सुरू झालं. निफ्टीनं ५८ अंकांच्या वाढीसह २५१८६ च्या पातळीवर व्यवहार करण्यास सुरुवात केली, तर सेन्सेक्सनं १२९ अंकांच्या वाढीसह ८२१०२ च्या पातळीवर व्यवहार करण्यास सुरुवात केली.

बँकिंग आणि आयटी क्षेत्रात सातत्यानं खरेदी दिसून येत आहे. मंगळवारच्या सत्राच्या सुरुवातीलाच बँकिंग आणि आयटी शेअर्सचा दबदबा कायम आहे.सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल, इन्फोसिस, एचसीएसएल टेक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून वाढ दिसून येत आहे, तर ओएनजीसी, हिंडाल्को, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, अपोलो हॉस्पिटल्ससारख्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे. तर दुसरीकडे निकालानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

शेअर बाजार सोमवारी दिवसभर सकारात्मक राहिला आणि दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. ह्युंदाईचा आयपीओ आज बाजारात लाँच होणार असून, हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असून २७,८७० कोटी रुपयांचा इश्यू साईज आहे. "बाजारानं हळूहळू वेग घेतला आहे आणि निफ्टी २५ हजारांच्या वर राहिला आहे. ही तेजी स्टॉक स्पेसिफिक अॅक्शनसह सुरू राहील, अशी आमची अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया मोतीलाल ओसवालचे रिसर्च, वेल्थ मॅनेजमेंट हेड सिद्धार्थ खेमका यांनी दिली. 

अमेरिकन बाजारात तेजी

सोमवारी वॉल स्ट्रीटमध्ये तेजी होती. कॉर्पोरेट कमाई आणि महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीनं व्यस्त असलेल्या आठवड्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्समध्ये खरेदी केल्यानं एस अँड पी 500 आणि डाऊ या दोन्ही निर्देशांकांनी नवीन विक्रमी क्लोजिंग दिसलं.

आशियाई शेअर बाजारात तेजी

वॉल स्ट्रीटवरील आणखी एका दमदार कामगिरीनंतर आशियातील शेअर बाजारात तेजी आली. टोक्योच्या वेळेनुसार सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी एस अँड पी ५०० फ्युचर्समध्ये थोडा बदल दिसून आला. तर जपानच्या टॉपिक्समध्येही ०,९ टक्क्यांची वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक