Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची भरारी, सेन्सक्स ३६० अंकांनी वधारला, निफ्टीतही तेजी

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची भरारी, सेन्सक्स ३६० अंकांनी वधारला, निफ्टीतही तेजी

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीसह झाली असून सेन्सेक्स-निफ्टीमध्या वाढ दिसून येत आहे. सकाळी कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई निर्देशांक ८२,५८८ वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:00 AM2024-09-02T10:00:21+5:302024-09-02T10:01:24+5:30

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीसह झाली असून सेन्सेक्स-निफ्टीमध्या वाढ दिसून येत आहे. सकाळी कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई निर्देशांक ८२,५८८ वर व्यवहार करत होता.

Stock Market Opening share market surges on the first day of the week Sensex rises by 360 points Nifty also rises | Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची भरारी, सेन्सक्स ३६० अंकांनी वधारला, निफ्टीतही तेजी

त्यांच्या उत्पादनांमध्ये पाश्चिमात्य स्नॅक्स आणि फ्रोजन फूड्सचाही समावेश आहे आणि बिकाजी उत्पादनं आज देशभरातील ८ लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. १९९२ मध्ये बिकाजींला इंडस्ट्रीयल एक्सिलंन्सी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीसह झाली असून सेन्सेक्स-निफ्टीमध्या वाढ दिसून येत आहे. सकाळी कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई निर्देशांक ८२,५८८ वर व्यवहार करत होता. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाले तर निफ्टीच्या सेक्टोरल इंडेक्समध्ये आज सकाळी ओपनिंगदरम्यान बँक शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स ३५९.५१ अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांच्या वाढीसह ८२,७२५.२८ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९७.७० अंकांनी म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी वधारून २५,३३३.६० वर उघडला.

२६ शेअर्समध्ये तेजी

बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ शेअर्समध्ये तेजी तर 4 शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. या ३० शेअर्समध्ये एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक वधारले असून आयटीसी, एचसीएल, बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येत आहे. बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्सही तेजीसह व्यवहार करत आहेत.

निफ्टी शेअर्सचे अपडेट?

निफ्टीच्या ५० पैकी ३६ शेअर्समध्ये तेजी तर ८ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. ६ शेअर्स असे आहेत ज्यात कोणताही बदल होताना दिसत नाही. बजाज फायनान्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी लाइफ आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे शेअर्स आज निफ्टीत सर्वाधिक वधारले. आज टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, हिंडाल्को या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

Web Title: Stock Market Opening share market surges on the first day of the week Sensex rises by 360 points Nifty also rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.