Stock Market Opening: सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात आज चांगली झाली असून बीएसई सेन्सेक्स २५० अंकांच्या उसळीसह उघडला. बाजारातील अस्थिरता सांगणारा इंडिया व्हीआयएक्स म्हणजेच निर्देशांक सध्या घसरत आहे, म्हणजेच बाजारातील ताकद वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आज ग्रीन झोनमध्ये उघडला आणि आयसीआयसीआय बँक तेजीसह व्यवहार करीत आहे. बँक निफ्टी तब्बल ३५० अंकांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे.
दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स २५१.३८ अंकांनी म्हणजेच ०.३२ टक्क्यांनी वधारून ७९,६५३.६७ वर उघडला. तर निफ्टी ७०.३० अंकांनी म्हणजेच ०.२९ टक्क्यांच्या वाढीसह २४,२५१.१० वर उघडला.
सेन्सेक्सवर शेअर्सची स्थिती
बीएसई सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर ३० पैकी २१ शेअर्समध्ये तेजी आणि ९ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँकेला सर्वाधिक फायदा झाला असून यासह एसबीआय, एनटीपीसी, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, टाटा स्टीलआणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
तर एल अँड टी, टेक महिंद्रा, आयटीसी, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, अॅक्सिस बँक आणि एचयूएलच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.