Join us

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex ८२ हजारांच्या खाली, Titan-JSW आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:52 IST

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली.

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली. सेन्सेक्स १५२ अंकांनी घसरून ८१,९५३ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३४ अंकांनी घसरून २४,७३४ अंकांवर उघडला. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत असून दोन्ही क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

कामकाजादरम्यान सेन्सेक्सचे ३० पैकी १० शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत तर २० शेअर्स घसरत आहेत. तेजीच्या शेअर्समध्ये आयटीसी ०.५० टक्के, लार्सन ०.४२ टक्के, रिलायन्स ०.४१ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.२८ टक्के, टाटा स्टील ०.२० टक्के, एचसीएल टेक ०.१३ टक्के, अदानी पोर्ट्स ०.०५ टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत होते. तर जेएसडब्ल्यू सिमेंट ०.७६ टक्के, टेक महिंद्रा ०.७० टक्के, टायटन ०.७६ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.५७ टक्के, अॅक्सिस बँक ०.४७ टक्के, टीसीएस ०.४५ टक्क्यांनी घसरले.

सेक्टोरल अपडेट

आजच्या व्यवसायातील तेजी असलेल्या क्षेत्रांवर नजर टाकली तर रिअल इस्टेट, मीडिया आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या तीनच क्षेत्रांचे शेअर्स तेजीत आहेत. तर बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी हेल्थकेअर आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये घसरण झाली आहे. निर्देशांकात घसरण झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांक २४३ अंकांनी तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ११८ अंकांनी वधारला आहे.

चालू आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हसह जगभरातील १८ मध्यवर्ती बँका व्याजदर जाहीर करणार आहेत. १८ डिसेंबर रोजी व्याजदरांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करू शकते, अशी अपेक्षा आहे. आज भारतातील घाऊक किमतींवर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

टॅग्स :शेअर बाजार