Join us  

Stock Market Opening: शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, निफ्टी २५ हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 9:56 AM

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात आज जोरदार तेजीसह व्यवहार सुरू झाले आहेत. जागतिक संकेत मजबूत असून अमेरिकी बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजारातही आज तेजी दिसून आली.

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात आज जोरदार तेजीसह व्यवहार सुरू झाले आहेत. जागतिक संकेत मजबूत असून अमेरिकी बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजारातही आज तेजी दिसून आली. निफ्टीचे सर्व सेक्टोरल इंडेक्स तेजीसह व्यवहार करत असून ऑटो, आयटी मेटल, पीएसयू बँक, फार्मा आणि एफएमसीजी, रियल्टी आणि ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

आज, गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ४०७.०२ अंकांनी म्हणजेच ०.५० टक्क्यांच्या वाढीसह ८१,९३० वर व्यवहार करत होता. याशिवाय एनएसईचा निफ्टी १४१.२० अंकांच्या म्हणजेच ०.५७ टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह २५,०५९ वर उघडला.

बीएसई आणि एनएसईचे शेअर्स अपडेट

बीएसईच्या प्रमुख निर्देशांकात सुरुवातीला २३ शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून केवळ ७ शेअर्समध्ये घसरण दिसूत आहे. एनएसई निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ४३ शेअर्समध्ये तेजी तर ७ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. कामकाजदरम्यान आज टाटा स्टील, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टी, एसबीआय बँक, अदानी पोर्ट्स, बजाज फायानान्स, पॉवरग्रीड, टेक महिंग्रा, एचसीएल टेक यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर कामकाजाच्या सुरुवातीला रिलायन्स, टाटा मोटर्स, सन फार्मा, एशियन पेंट्स यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

बीएसईचे बाजार भांडवल कालच्या ४६३.४९ लाख कोटी रुपयांवरून ४६४.११ लाख कोटी रुपयांवर आलं आहे. मंगळवारी बीएसईवर लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४६०.९६ कोटी रुपये होतं.

टॅग्स :शेअर बाजार