Stock Market Opening : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. गुरुवारी तर सेन्सेक्स ऐतिहासिक सर्वोच्च पातळीवर पोहचला होता. यात अवघ्या काही तासांता गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये कमावले. देशांतर्गत शेअर बाजारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओच्या लिस्टींगच्या दिवशी शेअर बाजारात प्रचंड हालचाल पाहायला मिळाली. यूएस फेडरल बँकेची बुधवारी बैठक होणार आहे. ही जागतिक बाजारांसाठी मोठा संकेत असणार आहे. दरम्यान, आज बँक निफ्टी 52,000 च्या वर उघडला आहे. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये बँक निफ्टीच्या 12 पैकी 9 शेअर्समध्ये वाढ होत आहे. मेटल्स शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत असून मेटल इंडेक्समध्ये जोरदार वाढ होत आहे. तुमच्याकडेही या कंपन्यांचे शेअर्स असतील तर आज तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते.
कशी झाली मार्केटची सुरुवात?
BSE सेन्सेक्स 94.39 अंकांच्या किंवा 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 82,985 वर उघडला तर निफ्टी50 15 अंकांच्या किंवा 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 25,406 वर उघडला. आज बाजारात हलक्या प्रमाणात वाढ दिसत आहे.
6 कोअर शेअर्समध्ये ट्रेड कसा आहे?
आज बाजार उघडण्याच्या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 12 रुपयांची वाढ दिसून येत आहे. एचडीएफसीच्या शेअर्समध्ये फ्लॅट ट्रेडिंग होताना दिसत आहे. तर टीसीएस, इन्फोसिस आणि L&T वर आहेत. तुमच्याकडे एचयूएलचे शेअर्स असतील तर वाईट बातमी आहे. कारण, एचयूएलमध्ये आज 2.60 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. मुख्य 6 स्टॉक्सपैकी फक्त HUL खाली आहे. तर उर्वरित 5 शेअर्स ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. आज एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली आहे. पण त्यामागचे कारण खाद्यतेलावरील शुल्कावरील निर्णय मानले जात आहेत.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार कसा होता?
शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये, बीएसईचा सेन्सेक्स 90.09 अंकांच्या किंवा 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 82981 वर उघडला तर एनएसईचा निफ्टी 54.30 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 25 हजार 410 वर उघडला आहे.
निफ्टी शेअर्सची स्थिती
निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 38 शेअर्समध्ये वाढ तर 12 शेअर्समध्ये घसरण होत आहे.
बजाज हाउसिंग फायनान्सची आज लिस्टिंग
आज बजाज हाऊसिंग फायनान्सची लिस्टिंग होणार आहे. शेअर बाजारात त्याच्या IPO च्या जवळपास दुप्पट पातळीवर लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर ओपीओ मिळाला असेल तर तुमची लॉटरी लागलीच समजा.