Join us

Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; गुंतवणूकदारांनी गमावले ४८.८ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 9:51 AM

Stock Market News: जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी घसरण दिसून आली.

Stock Market News: जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे. आयटी वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्र रेड झोनमध्ये आहेत. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ४८.८ हजार कोटी रुपयांनी घसरलंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४८.८ हजार कोटी रुपयांची घट झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स कामकाजादरम्यान २१२.८८ अंकांनी म्हणजेच ०.२६ टक्क्यांनी घसरून ८०,५०३.67 वर आणि निफ्टी ५० ५९.१५ अंकांनी म्हणजेच ०.२४ टक्क्यांनी घसरून २४,५५३.८५ वर व्यवहार करत होता.

संपत्तीत ४८.८ हजार कोटींची घट

एक दिवसापूर्वी म्हणजेच १६ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५५,२४,६१७.८३ कोटी रुपये होतं. आज १८ जुलै २०२३ रोजी बाजार उघडताच तो ४,५४,७५,७२५.११ कोटी रुपये होता. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ४८,८९२.७२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

११ शेअर ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी ११ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. इन्फोसिस, टीसीएस आणि अॅक्सिस बँक या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले. दुसरीकडे एशियन पेंट, एचडीएफसी बँक आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. 

टॅग्स :शेअर बाजार