शेअर बाजारात पीसी ज्वेलरच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 134 रुपयांवर बंद झाला. हा शेअर त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात पीसी ज्वेलरचा शेअर 400% हून अधिक वधारला आहे. तर, दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, विमा कंपनी एलआयसीनेही पीसी ज्वेलरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. LIC कडे पीसी ज्वेलरचे 67 लाखहून अधिक शेअर्स आहेत.
एका वर्षात 400% हून अधिकचा परतावा -
पीसी ज्वैलरच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात 400 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर 12 सप्टेंबर 2023 रोजी 26.70 रुपयांवर होता. तो 12 सप्टेंबर 2024 ला 134 रुपयांवर बंद झाला. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरने 167 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी पीसी ज्वैलरचा शेअर 50.35 रुपयांवर होता. तो 12 सप्टेंबर 2024 रोजी 134 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यांचा विचार करता पीसी ज्वैलरच्या शेअरमध्ये 121 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
कंपनीला आयकर विभागाकडून 67.54 कोटी रुपये रिफंड -
पीसी ज्वैलरने दिलेल्या माहिती नुसार, त्यांना आयकर विभागाकडून 67.54 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितल्यानुसार, हा परतावा अथवा रिफंड 6 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाला आहे. या शिवाय त्यांच्या वन टाइम सेटलमेंट (OTS) प्रपोजललाही कोटक महिंद्रा बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेने वन-टाइम सेटलमेंटसाठी अप्रूव्हल दिल्याचेही पीसी ज्वैलरने सांगितले होते.
LIC कडे 67 लाखहून अधिक शेअर -
विमा कंपनी LIC कडे पीसी ज्वैलरचे तब्बल 67,51,662 एवढे शेअर अथवा 1.45 टक्के हिस्सेदारी आहे. शेअरहोल्डिंगचा हा डेटा जून 2024 तिमाहीपर्यंतचा आहे.